बृहन्मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर
मुंबई दि.०९ :- बृहन्मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संघटेनांच्या कृती समितीने ३० हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी केली होती.
रस्त्याची कामे रखडविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द
महापालिका प्रशासन मात्र २५ हजार रुपये बोनस देण्यावर ठाम होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस महापालिका अधिकारी, कामगार नेते उपस्थित होते.
वायू प्रदूषणास कारणीभूत सोन्या, चांदीचे दागिने घडविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर २६ हजार रुपये बोनस देण्यावर शिक्कामोर्तब झाले. महापालिकेतील एक लाख पाच हजार आणि बेस्ट उपक्रमातील ४० हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेच्या मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही २६ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे.