रस्त्याची कामे रखडविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द
मुंबई दि.०९ :- मुंबई शहर भागातील रस्त्याची कामे रखडविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. रस्ते विभागाने महापालिका प्रशासनाकडे अहवाल पाठविला होता. शहर विभागातील कामे रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड (आरएसआयएल) या कंत्राटदाराला देण्यात आली होती.
राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सरसावले
मात्र या कंत्राटदाराने कामे सुरू न केल्यामुळे त्यांना वारंवार समज देण्यात येऊन दंडात्मक कारवाईही आली होती. मात्र तरीही कंत्राटदाराने कामे सुरू केली नाहीत. त्यामुळे कंत्राटदाराकडून कामे काढून घेण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती.
कामा रुग्णालयातील मियावाकी उद्यानात ४५ प्रकारच्या दीड हजार झाडे लावणार
या नोटीसीनंतर कंत्राटदाराने सुनावणीची मागणी केली. महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला सुनावणीसाठी बोलाविले होते. मात्र कंत्राटदार सुनावणीला आलाच नाही. त्याने सुनावणीसाठी आणखी पुढची तारीख मागून घेतली. कंत्राटदाराला पुढील सुनावणीची तारीख न देता त्याचे कंत्राट रद्द करावे, अशी शिफारस रस्ते विभागाने केली होती.