गुन्हे-वृत

मालमत्ता खरेदी व्यवहारात १४ कोटींची फसवणूक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गोव्यात दाखल

गोव्याच्या माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

मुंबई दि.०९ :- मालमत्ता खरेदी व्यवहारात १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने गोव्यातील रिअल इस्टेट कंपनी आणि तीन संचालकांविरुद्ध १४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी कंपनीचे एक संचालक सुरेश परुळेकर गोव्यातील माजी मंत्री आहेत.

सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर – आदेश बांदेकर यांना हटविले

मुंबईमधील ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये जून महिन्यात याप्रकरणी रेईश-मागूश रिअल इस्टेट कंपनीचे संचालक व माजी मंत्री सुरेश परुळेकर यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरेश परुळेकर यांच्यासह प्रसाद परुळेकर आणि मंदा सुरेश परुळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून हे तिघेही कंपनीचे संचालक आहेत. गुन्हा दाखल झाल्यानतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड एक दिवसाच्या मुंबई भेटीवर

गोव्यातील डिचोली येथील रहिवासी असलेल्या प्रेमचंद गवस यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गवस यांनी जानेवारी २००८ ते फेब्रुवारी २०२३ या काळात परुळेकर यांना नियमित हप्त्यांमध्ये १४ कोटी ९० लाख रुपये दिले होते. ठरावीक कालावधीत गवस यांना जमीन मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *