कामा रुग्णालयातील मियावाकी उद्यानात ४५ प्रकारच्या दीड हजार झाडे लावणार
मुंबई दि.०९ :- मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या कामा रुग्णालयामध्ये आणखी एक मियावाकी उद्यान उभारण्यात येणार आहे. कामा रुग्णालयाच्या आवारातील तब्बल ७ हजार चौरस फूट जागेवर हे मियावाकी वन उभे राहणार असून असून, त्यामध्ये विविध ४५ प्रकारची १ हजार ५०० झाडे लावण्यात येणार आहेत.
सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर – आदेश बांदेकर यांना हटविले
वन ग्लेनमार्क फाऊंडेशनच्या माध्यमातून हे उद्यान उभारण्यात येणार आहे. अडुळसा, आवळा, दालचिनी, हिरडा, बदाम, फणस, कडीपत्ता, आंबा, कोकम, नागचाफा, करवंद, पिंपळ, शमी, सीता अशोक, सोनचाफा, सुपारी, तेजपत्ता, वड, रिठा, पारिजात, निरगुंडी आदी देशी आणि आयुर्वेदिक झाडे लावण्यात येणार आहेत.