सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर – आदेश बांदेकर यांना हटविले
मुंबई दि.०७ :- मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना अध्यक्षपदावरून हटवून सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरवणकर दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्यावर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि उबाठा गटात वाद झाला होता. तेव्हा सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला.