वायू प्रदूषणास कारणीभूत सोन्या, चांदीचे दागिने घडविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई
मुंबई दि.०७ :- बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून आज ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील सोन्या, चांदीचे दागिने घडविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली.
या व्यावसायिकांच्या चार भट्ट्या, धुराडी पाडण्यात आली. नागरी वस्त्यांमधील हे कारखाने वायू प्रदुषणास कारणीभूत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड एक दिवसाच्या मुंबई भेटीवर
बांधकामाव्यतिरिक्त वायू प्रदुषणाला कारणीभूत असलेल्या इतर घटकांवरही कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.