भारत-पाक सीमेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अनावरण
मुंबई दि.०६ :- काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्या (मंगळवार ७ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने हा पुतळा बसविण्यात आला आहे.
मेट्रो ७ अ मार्गिका; दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला सुरुवात
२० ऑक्टोबर २०२३ या दिवशी राजभवन येथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळा मार्गस्थ करण्यात आला. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.