उपराष्ट्रपती जगदीप धनखड एक दिवसाच्या मुंबई भेटीवर
मुंबई दि.०६ :- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. उपराष्ट्रपती आयआयटी, मुंबई येथील विद्यार्थी, कर्मचारी तसेच शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.