मेट्रो ७ अ मार्गिका; दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला सुरुवात
मुंबई दि.०६ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ या मार्गिकेतील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला सुरुवात झाली आहे. ६० टीबीएम यंत्राच्या मदतीने भुयारीकरण करण्यात येत आहे.
भुयारीकरणाचे प्रारंभिक काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. दोन्ही बोगद्यांच्या भुयारीकरणाचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यास अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवास अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.