कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये सोमवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबई दि.०४ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पवई निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जाणार असून कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये ६ नोव्हेंबरपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
कुर्ला पश्चिम परिसरातील काही प्रभाग, तसेच उंचीवरील वस्तींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व परिसरातील बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका, घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील टिळक नगर, बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका, कुर्ला – अंधेरी रस्त्यावरील जरी मरी, विजय नगर, एल.बी.एस. नगर, शास्त्री नगर, शेट्टीया नगर, सत्य नगर जलवाहिनी, वायर गल्ली, ३ नंबर खाडी या विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.