* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष

ठाणे दि.०४ :- ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” सुरू करण्यात आला आहे. तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण ठाणे महसूल प्रशासन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत.

कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहीम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासन दोन पातळीवर काम करीत असून राज्यभर कुणबी नोंदी तपासण्याची कार्यवाही सुरू करतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाला “इम्पॅरिकल डेटा” जमा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. “इम्पॅरिकल डेटा” गोळा करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज या नामवंत संस्थांची मदत घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *