वैद्यकीय उपकरणे आणि औषधांवर आकारण्यात येणारा भरमसाठ वस्तू आणि सेवा कर कमी करावा
विविध वैद्यकीय संघटनांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
मुंबई दि.०४ :- वैद्यकीय उपकरणे आणि औषधांवर आकारण्यात येणारा भरमसाठ वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी करावा, अशी मागणी देशातील विविध वैद्यकीय संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.
कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये सोमवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा
केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणे आणि औषधांवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कराची आकारणी केली आहे. यामुळे वैद्यकीय उपकरणे व औषधांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी, देशातील उपचारांवरील खर्चामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
दरम्यान या मागणीची पूर्तता व्हावी यासाठी इंडियन कॅन्सर काँग्रेसही (आयसीसी) प्रयत्न करेल, असे आश्वासन आयसीसीचे प्रमुख आयोजक डॉ. संजय शर्मा यांनी दिले.