महत्त्वाचे ओबीसी नेते , मंत्र्यांना राज्य सरकार सुरक्षा पुरविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.३१ :- राज्यातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना राज्य सरकार कडून सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावू नका, उपोषण सोडा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी हिंसात्मक आंदोलन सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ला करून घराची जाळपोळ करण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आश्वासन दिले.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अभिनेते, कवी किशोर कदम यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम
राज्यातील महत्त्वाचे ओबीसी नेते आणि मंत्र्यांना ही सुरक्षा देण्यात येईल. गृह खात्याकडून खबरदारीचा उपाय म्हणून इंटेलिजन्सच्या मदतीने हल्ले रोखण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.