निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावू नका, उपोषण सोडा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जरांगे पाटील यांना आवाहन
मुंबई दि.३१ :- निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये, उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून ठाकरे यांनी हे समाज माध्यमातून एका निवेदनाद्वारे जरांगे पाटील यांना हे आवाहन केले आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अभिनेते, कवी किशोर कदम यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम
राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवे आहे. ते एकदा मिळाले की हे आपली सगळी आश्वासने विसरणार अशी त्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणे योग्य वाटत नाही. तुमचे उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावे, अशी विनंती ठाकरे यांनी या पत्रात जरांगे पाटील यांना केली आहे.