दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अभिनेते, कवी किशोर कदम यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम
मुंबई दि.३१ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या ४ नोव्हेंबररोजी संध्याकाळी साडेपाच वाजता अभिनेते,कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासून दाखले द्यायला सुररुवात
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या गोखले सभागृहात होणा-या या कार्यक्रमात राजीव श्रीखंडे कदम यांच्याशी संवाद साधणार आहेत. वासुदेव व नलिनी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्या धामणकर यांनी सहाय्य केले आहे.