मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त
ठाणे दि.३१ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून अनेक आमदार, खासदारांच्या निवासस्थानी जाळपोळ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी शंभर मीटरच्या अंतरावर अडथळे उभारून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.