मुंबईतील ‘काळी पिवळी’ टॅक्सी आता इतिहासजमा
मुंबई दि.२९ :- मुंबईतील ‘काळी पिवळी’ टॅक्सी (प्रीमियर पद्मिनी) लवकरच मुंबईकर प्रवाशांचा निरोप घेणार आहे. ‘बेस्ट’च्या लाल डबल डेकर डिझेल बसपाठोपाठ आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा वापर बंद करण्यात येणार आहे.
पर्यावरण नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहुल येथील उद्योगांना नोटीस
२९ ऑक्टोबर २००३ रोजी तारदेव आरटीओ येथे प्रीमियर पद्मिनी गाडीची शेवटची काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणी झाली होती. शहरात टॅक्सी चालवण्याची मर्यादा २० वर्षे असल्याने आता मुंबईत ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी अधिकृतपणे धावणार नाहीत.