पर्यावरण नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहुल येथील उद्योगांना नोटीस
हिंदूस्तान पेट्रोलियम, टाटा पॉवर यांचा समावेश
मुंबई दि.२९ :- पर्यावरण नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी इंधन निर्मिती करणाऱ्या माहुल येथील उद्योगांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यात हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या आस्थापनांचा समावेश आहे.
पिवळ्या तापावरील प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचे उद्या (सोमवार) उदघाटन
एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या उद्योगांची दहा व पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त करून त्यांना ५० टक्क्यांपर्यंतच उत्पादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे पाऊल उचलले आहे.