शिवाजी उद्यान परिसरातील ‘धुळ’फेक थांबविण्याची स्थानिक रहिवांची मागणी
महापालिका,प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
मुंबई दि.२९ :- गेल्या काही दिवसांपासून दादरच्या शिवाजी उद्यान परिसरातील धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहेत. शिवाजी पार्क उद्यानातील माती वाऱ्यामुळे उडत असून खेळाडू, रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होत आहे. स्थानिक रहिवाशांनी बृहन्मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून ही ‘धूळ’दाण थांबवण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील ‘काळी पिवळी’ टॅक्सी आता इतिहासजमा
दरम्यान उद्यानातील माती उडू नये म्हणून बृहन्मुंबई महापालिकेने मैदानावर पाण्याची फवारणी सुरू केली आहे. लवकरच मैदानातील ५० टक्के जागेत गवत लावण्यात येणार आहे. धुळीच्या समस्येवर मात करण्यासाठी अन्य उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला आहे.