पिवळ्या तापावरील प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचे उद्या (सोमवार) उदघाटन
मुंबई दि.२९ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये पिवळ्या तापावरील (पिवळा ज्वर) प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचे उद्या (सोमवार) उदघाटन होणार आहे. लसीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाअंतर्गत हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे
बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत या केंद्रात लस उपलब्ध असेल. लस घेण्यासाठी प्रत्येकी ३०० रूपये शुल्क आकारण्यात येणार असून लसीकरणासाठी येताना नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) आणणे बंधनकारक आहे.महापालिकेच्या केईएम रूग्णालयात याआधीच पिवळ्या तापावरील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
आफ्रिकन देशांमध्ये ‘पिवळा ताप’ हा गंभीर आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या इतर नागरिकांनाही पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आफ्रिकन देशात जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस देणे अत्यावश्यक आहे.