बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात आम्हालाही कार्यालय मिळावे- अंबादास दानवे
मुंबई दि.२७ :- बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना कार्यालये देण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर महापालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेते म्हणून आम्हालाही कार्यालय द्यावे, अशी मागणीचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे केली.
कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील समितीला २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ
दानवे यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना २१ जुलै रोजी महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर दालन देण्यात आले, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना पहिल्या मजल्यावर लोढा यांच्या दालनाशेजारचे दालन देण्यात आले आहे.
बांधकाम मजुरांसाठीची माध्यान्ह भोजन योजना येत्या १ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे आदेश
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध केला होता. पालकमंत्र्यांच्या मागणीमुळे ही दालने देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले होते.