उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला
मुंबई दि.२६ :- शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज माझगाव महानगरदंडाधिकाऱ्यांनी आज फेटाळला. त्यामुळे, या दोघांना आता मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
गिरगाव येथील अभ्यासिकेचे उदघाटन
आपल्याविरोधात कोणताही पुरावा नाही. आपल्यावर केलेले आरोपही संदिग्ध आहेत. थोडक्यात, या प्रकरणी आपल्याला गोवण्यात आले असून प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी ठाकरे आणि राऊत यांनी केली न्यायालयाकडे केली होती. शेवाळे यांच्यातर्फे या मागणीला विरोध करण्यात आला होता.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
महान्यायदंडाधिकारी एस. बी. काळे यांनी ठाकरे आणि राऊत यांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्यास नकार दिला. तसेच, त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला.