गिरगाव येथील अभ्यासिकेचे उदघाटन
मुंबई दि.२६ :- बृहन्मुंबई महापालिकेने गिरगावमधील खोताची वाडी येथे उभारलेल्या अभ्यासिकेचे उदघाटन राज्याचे कौशल्य विकास आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे दोन हजार चौरस फूट जागेत ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईत विशेषतः गिरगाव आणि परिसरात लहान लहान खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा व शांतता शोधावी लागते. त्यामुळे खोताची वाडी परिसरात प्रशस्त अभ्यासिका सुरू करण्याचे आदेश लोढा यांनी महापालिकेला दिले होते.