मनोज जरांगे यांना तातडीने अटक करून कारवाई करा – गुणवंत सदावर्ते
मुंबई दि.२६ :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी आज केली. मराठा समाजातील काही तरुणांनी विधिज्ञ सदावर्ते यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.
मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गावर पुढील महिन्यात चाचण्या सुरू
पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तोडफोडीच्या या घटनेनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सदावर्ते यांनी जरांगेच्या अटकेची मागणी केली.
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला
पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झालेली ही मालिका आज माझ्या घरावरील हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. जातीपातीचे राजकारण करून या देशातील विचाराचे आणि गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात. हे तुकडे होऊ नयेत, त्यासाठी लढा देईन, असेही सदावर्ते यांनी सांगितले.