हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई दि.२१ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
अन्यथा मुंबईतील खासगी तसेच शासकीय बांधकामे थांबविण्यात येतील – महापालिका आयुक्त चहल
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा येथून वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे / गोरेगावसाठी जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.
परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ – राज्य शासनाचा निर्णय
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेगाब्लॉक कालावधीत अप-डाउन जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.