अन्यथा मुंबईतील खासगी तसेच शासकीय बांधकामे थांबविण्यात येतील – महापालिका आयुक्त चहल
मुंबई दि.२१ :- मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली जावी. अन्यथा खासगी तसेच शासकीय बांधकामे थांबविण्यात येतील, असा इशारा बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिला आहे. वातावरणातील बदलामुळे मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.
आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिकांची सहा गटांमध्ये विभागणी करून पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला
या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत मुंबई महापालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको आदी विभागांची संयुक्त बैठक महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. त्यावेळी चहल यांनी हा इशारा दिला.
कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजभवनातून रवाना
पावसाळा संपून जेमतेम दहा-पंधरा दिवस उलटत नाही, तोच मुंबईसह महानगरातही हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. त्याची दखल केंद्र व राज्य सरकारने घेतली असून, तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले. यासंदर्भात नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांचे पालन सर्व यंत्रणांनी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.