आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिकांची सहा गटांमध्ये विभागणी करून पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला
मुंबई दि.२१ :- आमदार अपात्रता प्रकरणी ३४ याचिकांची सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून या सर्व प्रकरणांवर आता येत्या २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ – राज्य शासनाचा निर्णय
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर नार्वेकर यांनी उपरोक्त निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे दोन्ही पक्षांनी २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावीत, असे आदेशही नार्वेकर यांनी दिले.