परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ – राज्य शासनाचा निर्णय
मुंबई दि.२१ :- राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजभवनातून रवाना
सरकारने शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. बारमधील मद्यदरात वाढ होणार असली तरी स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तेथील व्हॅट आधीपासूनच २० टक्के इतका आहे.