कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजभवनातून रवाना
मुंबई दि.२० :- कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आज राजभवन येथून समारंभपूर्वक रवाना करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन आणि रथपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे.
मुंबईत डिसेंबरमध्ये दोन दिवसीय धम्मदिक्षा सोहळ्याचे आयोजन- रामदास आठवले
या वेळी राज्यपाल बैस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवकालीन गडकिल्ल्यांचे फोर्ट सर्किट तसेच सर्व किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक तयार करण्यात यावे. येत्या ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला असून असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कुपवाडा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणली जाणार असून लंडन येथे लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’चे विश्वस्त अभयसिंह राजे शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव, राजेंद्र खेडकर यावेळी उपस्थित होते.