ठळक बातम्या

मुंबईत डिसेंबरमध्ये दोन दिवसीय धम्मदिक्षा सोहळ्याचे आयोजन- रामदास आठवले

मुंबई दि.२० :- डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले धम्मदीक्षा सोहळ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत्या १५ आणि १६ डिसेंबर रोजी मुंबईत बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिकन्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपूर येथे १४ ऑक्टोंबर १९५६ या दिवशी बौध्द धम्माची दीक्षा घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत १६ डिसेंबर १९५६ या दिवशी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा तो संकल्प अपूर्ण राहिला,असे आठवले यांनी सांगितले.

मालाड येथील प्राण्यांच्या दहनभट्टीत गेल्या महिन्यात १७० प्राण्यांवर अंत्यसंस्कार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा समारोह समितीतर्फे आयोजित या सोहळ्याला जागतिक बौद्ध धम्मगुरु दलाई लामा श्रीलंकेचे प्रधानमंत्री दिनेश गुणवर्धने तसेच कंबोडिया, व्हिएतनाह, थायलंडसह जगभरातील बौद्ध नेते उपस्थित राहणार आहेत. धम्मदीक्षा सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असेही आठवले म्हणाले. १५ डिसेंबर रोजी वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय क्रीडा स्टेडियमच्या डोममध्ये तर १६ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर कार्यक्रम होणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *