रेल्वे कारखान्यात जुन्या ५७ आयसीएफ डब्यांचे मालगाडी आणि अपघात निवारण गाडीत रुपांतर
मुंबई दि.१९ :- मध्य रेल्वेवरील माटुंगा, परळ रेल्वे कारखान्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत जुन्या ५७ आयसीएफ डब्यांचे रुपांत चार अपघात निवारण ट्रेन डब्यांत आणि अद्ययावत मालगाडीमध्ये (ऑटोमोबाईल कॅरियर) करण्यात आले.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घुसखोरी टाळण्यासाठी वितरीत केलेली प्रत्येक सदनिका आधारकार्डशी जोडणार
रेल्वेने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत ५४७ रेकमधून ७४,३१८ मोटारींची वाहतूक केली. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ४८१ रेकमधून ५७,४३१ मोटारींची वाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २९.४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत विधि महाविद्यालय सुरू
मध्य रेल्वेवर १८७९ साली वाफेवरील इंजिन तयार करण्यासाठी परळ कारखाना उभारण्यात आला होता. तर १९१५ साली रेल्वे डबे आणि इंजिन दुरुस्तीसाठी माटुंगा कारखाना उभारण्यात आला. या कारखान्यात डिझेल, विद्युत रेल्वे इंजिन, नॅरोगेज लोको तयार करण्यात येत असून त्यांची देखभाल-दुरूस्ती केली जाते.