ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प परवडणारी घरे उभारण्यात येणार – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई दि.१९ :- ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे उभारली जाणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इतरही आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
रेल्वे कारखान्यात जुन्या ५७ आयसीएफ डब्यांचे मालगाडी आणि अपघात निवारण गाडीत रुपांतर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार, राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार, कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता, इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा आदी निर्णयांचा यात समावेश आहे.