ज्येष्ठ प्रकाशक माधव त्रिंबक परचुरे यांचे निधन
मुंबई दि.१८ :- अध्यात्मिक आणि धार्मिक विषयांवरील पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगावातील ‘बलवंत पुस्तक भांडार’चे मालक आणि प्रकाशक माधव त्रिंबक परचुरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
१० टक्के आरक्षणाचा राज्यात सर्वाधिक लाभ मराठा समाजाला
माधव परचुरे यांच्या वडिलांनी १९०१ साली परचुरे पुराणिक आणि मंडळी या नावाने माधवबाग येथे पुस्तक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे १९४४ साली त्यांच्या वडिलांनी आणि चुलत बंधू यांनी मिळून बलवंत पुस्तक भांडारची सुरुवात केली.
अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील ललित पाटीलला अटक; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
नंतर चुलत बंधू या व्यवसायातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्रपणे प्रकाशन व्यवसाय सुरू केला. माधव परचुरे यांनी १९६८ साली मयूरेश प्रकाशन ही स्वत:ची प्रकाशन संस्था सुरू केली.