१० टक्के आरक्षणाचा राज्यात सर्वाधिक लाभ मराठा समाजाला
मुंबई दि.१८ :- आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) लागू करण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाचा राज्यात मराठा समाजालाच सर्वाधिक लाभ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंगळवारी सादर करण्यात आली.
अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील ललित पाटीलला अटक; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या लाभार्थ्यांची तसेच आरक्षणामध्ये मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात ७५ टक्के तर शासकीय नोकऱ्यांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक लाभ झाल्याची आकडेवारी बैठकीत सादर करण्यात आली.
उपनगरी रेल्वे स्थानकात २२ ऑक्टोबरपर्यंत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद; त्याच किंमतीत अन्य पर्याय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला दरवर्षी सादर करावा लागत होता. तो आता शैक्षणिक वर्षांच्या प्रथम वर्षांसाठी सादर केल्यानंतर तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ग्राह्य धरण्यात यावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार प्रवीण दरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.