दाट धुके पसरल्याने मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक उशिराने
वासिंद, टिटवाळा आणि कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धुक्याची चादर
मुंबई दि.१८ :- मध्य रेल्वेच्या वासिंद, टिटवाळा आणि कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आज सकाळी दाट धुके पसरले होते. या धुक्यामुळे कसारा, कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या.
१० टक्के आरक्षणाचा राज्यात सर्वाधिक लाभ मराठा समाजाला
बुधवारी सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत हे धुके पसरले होते. धुक्यामुळे मोटरमनला पाच फुटाच्या पलीकडील काही दिसत नसल्याने दिव्यांच्या प्रखर झोतात लोकल कमी वेगाने चालविण्याची कसरत मोटरमनना करावी लागली. परिणामी लोकल उशिराने धावत होत्या.