राजकीय

तुम्हाला जो मुख्यमंत्री हवाय, त्यासाठी कामाला लागा – भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सूचक इशारा

ठाणे दि.१७ :- तुम्हाला जो कोणी मुख्यमंत्री हवाय, त्यासाठी कामाला लागा, असा सुचक इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनी आज येथे दिला. भाजपाच्या महाविजय २०२४ अभियानातर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा दौरा करत आहेत. मंगळवारी त्यांनी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला.

उपनगरी रेल्वे स्थानकात २२ ऑक्टोबरपर्यंत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद; त्याच किंमतीत अन्य पर्याय

या दौऱ्यादरम्यान शहरातील गडकरी रंगायतन येथे ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपने नियुक्त केलेल्या एक हजार कार्यकर्त्यांसोबत बावनकुळे यांनी संवाद साधला.

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर – येत्या २७ ऑक्टोबररोजी पुरस्कार प्रदान सोहळा

२०२४ मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवय? असा प्रश्न बावनकुळे यांनी विचारला. त्यावर उपस्थितांकडून ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव एकमुखी घेण्यात आले. त्यावर आवाज येत नसून जोरात बोला असे बावनकुळे यांनी सांगितल्यानंतर पुन्हा ‘ देवेंद्र फडणवीस ‘ यांचे नाव घेतले. या मागणीनंतर बावनकुळे यांनी ‘ मग लागा कामाला ‘ असा सुचक इशारा कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *