वाहतूक दळणवळण

उपनगरी रेल्वे स्थानकात २२ ऑक्टोबरपर्यंत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद; त्याच किंमतीत अन्य पर्याय

मुंबई दि.१७ :- इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲंण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ‘रेलनीर’चा पुरवठा आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याला पर्याय म्हणून नऊ कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याचा पर्याय रेल्वे प्रशासनाने उपलब्ध केला असून हे पाणीही रेलनीरच्याच किंमतीत म्हणजे १५ रुपयांत मिळणार आहे.

कुर्ला ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर दुमजली वातानुकूलित बस धावणार

अंबरनाथ येथील रेलनीरचा कारखाना देखभाल-दुरुस्तीसाठी येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे.  यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा/कर्जत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, ठाणे ते पनवेल आणि चर्चगेट ते विरारदरम्यान रेलनीरचा पुरवठा बंद राहणार असल्याचे पत्र ‘आयआरसीटीसी’ने पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *