पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर – येत्या २७ ऑक्टोबररोजी पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई दि.१७ :- ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, सामाजिक कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आमदार जिग्नेश मेवाणी यांना पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार तर चित्रकार राजू बाविस्कर यांना ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुर्ला ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर दुमजली वातानुकूलित बस धावणार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने येत्या २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सचिवालय जिमखान्याजवळ, मंत्रालयासमोर येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. ज्येष्ठ संपादक, खासदार कुमार केतकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
यंदा पुरस्कारांचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून प्रत्येकी रोग दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवी- अभिनेता अक्षय शिंपी यांचे कथाकथन आणि ‘झुंड’फेम विपीन तातड आणि माहीजी या रॅप कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.