ठळक बातम्या

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई दि.१६ :- प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव संकल्पनेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (१९ ऑक्टोबर) होणार आहे. राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केद्रांचे दुपारी चार वाजता दूरदृश्य प्रणाली पद्धतीने उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्यातील विभागीय आय़ुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून (ऑनलाईन) बैठक झाली.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

कौशल्य विकास आय़ुक्त डॉ. ए. रामास्वामी यांनी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या या संकल्पनेबाबत आणि उदघाटन सोहळ्याच्या तयारीची माहिती सादर केली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगापोल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक जयश्री भोज आदी यावेळी उपस्थित होते.

करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी आयकर विभागाचे मुंबई, पुण्यात छापे; करार व्यवहारांची छाननी

या केंद्राच्या संख्येत भविष्यात वाढ करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांच्यासह ‘आशा’ व अंगणवाडी सेविका आदींनाही या कौशल्य विकास केंद्राच्या सोहळ्यात सहभागी करून घेण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *