शहरातील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरीत,स्थानिक पक्षांची गणना होणार
नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा निर्णय
मुंबई दि.१३ – राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरीत आणि स्थानिक पक्षांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती
आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमाअंतर्गत ही गणना केली जाणार असून, दुसऱ्यांदा फेर निविदा काढण्यात आली आहे. निविदा पूर्ण होताच पाणपक्षी गणनेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती महापालिका पर्यावरण विभागाकडून देण्यात आली. नवी मुंबई शहराला विस्तृत असा खाडी किनारा आणि जैवविविधता लाभली असून खाडी किनाऱ्यावर पक्षांना लागणारी जैवविविधता आहे.
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी जेट्टीच्या बांधकामाला सुरुवात; १११ कोटी रुपये खर्च
त्यामुळे फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षी खाडी किनाऱ्यावर दरवर्षी आश्रयाला येतात. मात्र याची माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे यावर्षीपासून नवी मुंबई महापालिका आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमाअंतर्गत या खाडी किनाऱ्यावरील पक्षांची गणना करणार आहे.