ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत १ हजार ५४१ जलमापकांची चोरी
ठाणे दि.१३ – गेल्या पाच वर्षांत ठाणे महापालिका क्षेत्रात १ हजार ५४१ जलमापके चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. सर्वाधिक चोरीचे प्रमाण कळवा परिसरात असून याठिकाणी ५९४ जलमापकांची चोरी झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होतो.
शहरातील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरीत,स्थानिक पक्षांची गणना होणार
नळजोडणीधारकांकडून ठराविक रक्कम देयकापोटी घेण्यात येत होती. अनेक ठिकाणी रस्ते आणि वाहने धुण्यासाठी पाण्याचा नागरिक वापर करत होते. या बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविले आहेत.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती
२०१९ मध्ये शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्यास सुरुवात झाली. महापालिका क्षेत्रात १ लाख १३ हजार ३२८ नळ जोडण्या असून त्यापैकी १ लाख ५ हजार नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्यात आली आहेत.