मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती
मीरा भाईंदर दि.१३ – मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाणार आहे. काशिमिरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे पोलीस ठाणे तयार करण्यात येणार असून आयुक्तालयातील हे १८ वे पोलीस ठाणे असणार आहे.
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी जेट्टीच्या बांधकामाला सुरुवात; १११ कोटी रुपये खर्च
१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. या नव्या आयुक्तालयात त्यावेळी एकूण १३ पोलीस ठाणी होती.
राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’!
त्यापैकी वसई विरार शहरात वसई, माणिकपूर, वालीव, तुळींज, नालासोपारा, अर्नाळा सागरी विरार अशी सात तर मिरा-भाईंदर शहरात मीरा रोड, भाईंदर, नयानगर, नवघर, काशिमिरा आणि उत्तन सागरी अशी सहा पोलीस ठाणी आहेत. पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी काशिगाव पोलीस ठाण्याचे उदघाटन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.