जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी जेट्टीच्या बांधकामाला सुरुवात; १११ कोटी रुपये खर्च
मुंबई दि.१३ – मुरुड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना उतरणे सुलभ व्हावे यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जंजिरा जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून हे काम करण्यात येत असून त्यासाठी १११ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे काम जून २०२४ मध्ये पूर्ण केले जाणार आहे.
राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’!
या किल्ल्यावर शिडाच्या बोटीने पोहोचावे लागते आणि किल्ल्यावर जेट्टी नाही. तसेच लाटा आणि वारा यामुळे बोट हेलकावे खात असल्याने लहान मुले, वृद्ध यांना बोटीतून उतरताना कसरत करावी लागते. बोटीतून किल्ल्याच्या पायऱ्यांवर उतरणे अनेकांना जमत नाही.
भायखळा रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे – लवकरच अन्य रेल्वे स्थानकातही बसविण्यात येणार
या पार्श्वभूमीवर किल्ल्याजवळ जेट्टी बांधावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य करून सागरी मंडळाने किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फोर्कन इन्फ्रा कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.