साहित्य

राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’!

मुंबई, दि. १२
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या जन्मगावी होणारा कार्यक्रम हे यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ठ्य असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी सांगितले.

१३ ऑक्टोबर रोजी कर्मवीर आ. मा. पाटील महाविद्यालय, पिंपळनेर व दीपरत्न माध्यमिक विद्यालय, पानखेडा, धुळे आणि भीमराव शिंदे महिला महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाई; १४ ऑक्टोबर रोजी राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर आणि १५ ऑक्टोबर रोजी ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन; मराठी विश्वकोश कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.‌

भाषा आणि भाषांतर, विदेशी मराठी साहित्य, वाचन संस्कृती आणि आव्हाने, मराठी विश्वकोश परिचय, कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण, वाचन संवाद आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *