भायखळा रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे – लवकरच अन्य रेल्वे स्थानकातही बसविण्यात येणार
मुंबई दि.१२ – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने चेहरा ओळख प्रणाली (एफआरएस) असलेले
सुसज्ज अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिला सीसी टीव्ही कॅमेरा भायखळा रेल्वे स्थानकात निर्भया निधीतून बसवण्यात आला.
दादर येथील अनधिकृत फुलविक्रेत्यांवर महापालिकेची कारवाई – १०० किलो माल जप्त
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण ही सहा स्थानके एकात्मिक सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत. या स्थानकात उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेले आणि चेहरा ओळखण्याची क्षमता असलेले सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
इस्रायलमध्ये अडकलेल्या १८ हजार भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’
उर्वरित स्थानकांत जुन्या तंत्रज्ञानावर आधारित सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता या स्थानकांतील सीसी टीव्ही कॅमेरेही अद्ययावत करण्यात येणार असून भायखळा रेल्वे स्थानकातून याची सुरुवात करण्यात आली आहे.