अकरावी प्रवेशाची सातवी आणि अंतिम प्रवेश फेरी आजपासून सुरु
मुंबई दि.११ :- दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण, एटीकेटी आणि अद्यापही प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाच्या सातव्या आणि अंतिम प्रवेश फेरीला आजपासून सुरुवात झाली. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जात बदल, वैयक्तिक माहितीसंबंधित असणारा प्रवेश अर्जाचा पहिला भाग आणि महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भाग येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भरता येणार आहे.
कंटेनर उलटल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल
महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भाग भरून झाल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत अर्ज लॉक करायचा आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशाची सातवी विशेष व अंतिम प्रवेश यादी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महापालिकेतील कर्मचारी- कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्याची मागणी
सातव्या विशेष प्रवेश फेरीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते १७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. कोट्यांतर्गत व द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेशही याच कालावधीत होणार आहेत.