शिवाजी उद्यानात दसरा मेळावा घेण्यास ‘उबाठा’ गटाला महापालिका प्रशासनाची परवानगी
मुंबई दि.१२ – शिवाजी उद्यान, दादर येथे दसरा मेळावा घेण्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. येथे दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडूनही अर्ज दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे उबाठा गट की शिवसेना यापैकी कोणाला परवानगी मिळणार? हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यासाठी करण्यात आलेला अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने गुरुवारी उबाठा गटाला शिवाजी उद्यानावर दसरा मेळावा घेण्याची औपचारिक परवानगी दिली.