डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटच्या वापरावर तातडीने निर्बंध आणा – विजय वडेट्टीवार
मुंबई दि.१० :- धोकादायक ठरलेल्या डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटच्या वापरावर सार्वजनिक ठिकाणी कठोर निर्बंध आणावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. डॉल्बीच्या कर्णकर्कश आणि जोरदार दणदणाटामुळे काही तरुणांचा ह्यदयविकाराने मृत्यू झाला.
कैद्याला अमली पदार्थ पुरविण्याच्या प्रकरणी आर्थर रोड तुरुंगातील पोलीस हवालदाराला अटक
तर लेझर लाईटमुळे अनेकांना नेत्रविकार झाल्याच्या घटना नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात समोर आल्या आहेत. डॉल्बीच्या कर्णकर्कश आणि जोरदार दणदणाटाचा प्रचंड त्रास रुग्णालयात व घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान बालकांना होतो,असे वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे.
पोलिसांकडून काही वेळा जनआग्रहास्तव आवाजाच्या मर्यादा पाळण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. पण ही मर्यादा पाळली जात नाही. सरकारने पुढाकार घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.