मुंबईत येत्या २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘मामी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
मुंबई दि.१० :- मुंबईत येत्या २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ (मामी) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात जगभरातील ७० विविध भाषांमधील अडीचशेहून अधिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटच्या वापरावर तातडीने निर्बंध आणा – विजय वडेट्टीवार
नीता अंबानी कल्चरल सेंटर (एनएमएसीसी) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या संचालिका अनुपमा चोप्रा यांनी २३ व्या ‘मामी’ मुंबई चित्रपट महोत्सवाची माहिती दिली.
कैद्याला अमली पदार्थ पुरविण्याच्या प्रकरणी आर्थर रोड तुरुंगातील पोलीस हवालदाराला अटक
‘मराठी टॉकीज’ विभागात आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’, क्षितिज जोशी दिग्दर्शित ‘ढेकूण’ आणि परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’तसेच स्पर्धा बाह्यविभागात ४६ दक्षिण आशियाई चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ‘डायमेन्शन्स मुंबई’सह ‘रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स’ अशा दोन माहितीपट-लघुपट स्पर्धाही यंदा होणार आहेत.