* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित रेल्वेत ३८ हजारांहून अधिक फुकटे प्रवासी – गेल्या सहा महिन्यांतील कारवाई – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित रेल्वेत ३८ हजारांहून अधिक फुकटे प्रवासी – गेल्या सहा महिन्यांतील कारवाई

मुंबई, दि. ९
वातानुकूलित रेल्वेत विनातिकीट किंवा वैध तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मोहीम राबविण्यात आली होती.‌ एप्रिल ते सप्टेंबर २००३ या कालावधीत ३८ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड ठोठाविण्यात आला.
वातानुकूलित लोकलमधील अनधिकृतपणे प्रवास रोखण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १२६.१३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

पश्चिम रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमेतून १२.६३ लाख फुकट्या प्रवाशांना पकडून ८१.१८ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. मुंबई सेंट्रल विभागातून २०.७४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबई उपनगरीय लोकल, मेल / एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर आणि हॉलिडे विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट नसलेल्या / अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *